Tuesday, January 14, 2020

कोगनोळी प्राथमिक कृषी पत्तीनची निवडणूक बिनविरोध


कोगनोळी, ता. १३ : येथे सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या प्राथमिक कृषी पद्धतीने सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणूक अधिकारी म्हणून गजानन लोकरे (चिकोडी) व सेक्रेटरी कृष्णात निकाडे यांनी काम पाहिले.
अनिल चौगुले, बाळासाहेब पाटील (प्रिन्स), रामचंद्र कागले, केशव पाटील, रवींद्र पाटील जगन्नाथ खोत, बिरसू धनगर, पुष्पाताई पाटील, सुलोचना मगदूम, अशोक कुरणे, जहांगीर कमते हे उमेदवार निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत.
शनिवार तारीख 11 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्यात आले.
रविवार तारीख 12 रोजी छाननी झाली. सोमवार तारीख 13 रोजी माघार झाल्यानंतर निवडणूक अधिकारी यांनी ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना अनिल चौगुले म्हणाले, माजी मंत्री वीरकुमार पाटील, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध झाली आहे. आतापर्यंत या संघाच्या माध्यमातून सभासदांची हीत जोपासण्याचे काम केले आहे. त्याचीच पोच म्हणून सभासदाने माजी मंत्री पाटील यांच्या पॅनेलला बिनविरोध निवडून दिले आहे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, बाळासाहेब कागले, युवराज पाटील, दिलीप पाटील, धनाजी पाटील, अमोल मोरडे, अनिल पाटील, कृष्णात भोजे, संदिप डोंगळे, झाकीर नाईकवाडे, तुकाराम पाटील, तात्यासो कागले, संभाजी आब्दागिरे, स्वप्नील आक्कोळे, अशोक मगदूम यांच्यासह अन्य ग्रामस्थ सभासद उपस्थित होते.
फोटो :
कोगनोळी : येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर नूतन संचालक मंडळ सोबत पंकज पाटील व इतर



No comments:

Post a Comment